श्री छत्रपती सह. सा.कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला,18 मे रोजी मतदान तर 19 मे रोजी ठरणार नवे कारभारी

आय मिरर
इंदापूर, बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडित असलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची दहा वर्ष रखडलेली पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे.गेले पाच वर्षे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती परंतु न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक प्रलंबित होती.
अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे आणि प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नीलिमा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार का ? की पवार विरुद्ध जाचक होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.छत्रपती सहकारी साखर कारखान्याची 7 एप्रिल 2025 रोजी निवडणूक जाहीर होईल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व स्वीकार करण्याची मुदत 7 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025 पर्यंत राहणार असून, पात्र उमेदवार यादी 16 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे.तर 18 मे रोजी मतदान तर 19 मे रोजी नवे कारभारी ठरणार आहेत.
निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार का ? की पवार विरुद्ध जाचक
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.मात्र या कारखान्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पवार घराण्याचे वर्चस्व आहे.पवार कुटुंबात दुफळी निर्माण झाल्याने आता हा कारखाना कोणाकडे जाणार यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भू विकास बँकेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप हे काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.
1992 साली उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वप्रथम या कारखान्याचे संचालक होऊन त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सर्वात झाली.त्यानंतर राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या राजकारणाची देखील सुरुवात याच कारखान्याच्या संचालक पदापासून झाली.दरम्यान या कारखान्यामध्ये अनेक सभासद बोगस असल्याचा आरोप पृथ्वीराज जाचक यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक गेली दहा वर्षे लांबली होती. हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयीन लढा सुरू असताना अजित पवार हे निवडणूक लादू इच्छित आहेत असा आरोप पृथ्वीराज जाचक यांनी नुकताच केला आहे. मात्र आता ही निवडणूक जाहीर करण्यात आल्याने ही निवडणूक पवार विरुद्ध पवार होते की, पवार विरुद्ध जाचक ? याकडे या कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचे त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?






