बिग ब्रेकिंग | सासवडच्या वनरक्षकाला एक लाख रुपये घेताना एसीबीने रंगेहात पकडले

आय मिरर (राहुल शिंदे)
सासवड वन विभागाच्या वनरक्षकाने गुन्हा दाखल न करण्यासाठी शेतकऱ्याला दोन लाख रुपयांची मागणी केली होती. यातील एक लाख रुपये स्वीकारताना या वन रक्षकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले आहे.त्याच्यावर सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोविंद रामेश्वर निर्डे असं या लाचखोर वनरक्षकाचं नाव आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पाळीव जनावरासाठी मुरघास तयार करण्यासाठी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता. वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्डा बुजवला.
परंतू वनरक्षक गोविंद निर्डे यांनी तक्रारदारावर यांना वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपद प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली.
या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दि. 4 मार्च रोजी सापळा लावला असता लोकसेवक गोविंद निर्डे यांनी तक्रारदाराकडून 1 लाख रुपये रक्कम लाच म्हणून सासवड येथील वीर फाटा येथील श्रीनाथ रसवंती गृहात स्वीकारले. याच वेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले
त्याच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक भारती मोरे पुढील तपास करत आहेत.
What's Your Reaction?






