1952 पासून आतापर्यंत माझ्याएवढ काम करणारा कोणताच आमदार नाही ; अजित पवारांचा शरद पवारांना चिमटा

आय मिरर
बारामतीत मी जेवढा आत्तापर्यंत काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केलं ते पाहा आणि मी केलेलं काम पाहा अजूनही काम करणार आहे असं म्हणत राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना चिमटा काढला आहे.
बारामतीत अजित पवारांच्या हस्ते दिव्यांगांना मोफत सायकल वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवार बोलत होते.
ते पुढे म्हणाले,बजेटमध्ये डीपीडीसीला 22000 कोटी दिले त्यातला एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा तरतूद केली आहे.दिव्यांगाना सहानभूती नको तर समान संधी पाहिजे. बारामतीत विकास कामे करतो आहे पण काही जण वेडे वाकडे पणा करतात.एक जण तर फुटपाथवर गाडी लाऊन गप्पा मारत होते.मी लगेच पोलिसांना ते जप्त करायला सांगितले आहे.कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे.
आजचा कार्यक्रम उन्हात आहे.सावलीत भाषण असतं तर बरं झालं असते. उन्हात भाषण करायचं बरं वाटत नाही.बीडीओ यांना म्हटलं होतं सावलीत घ्यायचं ना. उन्हात तुम्ही तापत आहात तो ताप माझ्यावर निघाला तर अवघड व्हायचे. असं म्हणायचं एकच हशा पिकला.
दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला आहे.सरकार सर्वांच्या हिताचे निर्णय करत आहे.मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढं काही करता येत नाही.पण काम करताना नीट करतो त्यामुळे पुढची लोकं म्हणतील चांगलं काम केलं.
परवा माझ्याकडे क्लिप आली.सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली. कुत्र्याला जसं मारत असतील तस मारलं मी पोलिसांना सांगितलं कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असं चालत राहिला तर मी मोका लावीन असं म्हणत अजित पवारांनी बारामती मधील मारहाणीच्या प्रकरणावर चांगलाच दम भरला आहे.
आपली मुलं काय करत आहेत हे लक्ष ठेवणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालकांनी पार पाडावी.मला काही लोकांचा फोन येतो की दादा पोटात या पोटात घ्या अरे काय पोटात घ्या पोट फुटायला लागलं. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही असं सांगायला. सगळ्यांना नियम सारखा असल्याचे अजित पवार म्हणाले.
What's Your Reaction?






