खायची होती 'एसी'ची हवा पण नशिबचं फुटकं ! लागला इंदापूर पोलिसांच्या हाती अन्
आय मिरर
फुकट एसी मिळवण्यासाठी एका युवकानं नामी शक्कल लढवली.फोन पे चे बनावट अँप्लीकेशन वापरुन खरेदी केलेल्या ए.सी.ची 36 हजार रुपये रक्कम ए.सी.विक्रेत्याच्या खात्यात पाठवली असा असा मॅसेज ही दाखवला.एवढेच नव्हे तर बनावट नाव सांगून विक्रेत्याकडून तशी पावतीही घेतली.त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे ए.सी.विक्रेत्याच्या लक्षात आल्यावर त्याने इंदापूर पोलिसात धाव घेतली,इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोनच दिवसात संबंधिताला ताब्यात घेतले आहे.
आरबाज आमीरखान जमादार रा.लुमेवाडी ता इंदापूर जि पुणे असं ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नांव असून त्याकडून पोलिसांनी फसवून खरेदी केलेला एल.जी.कंपनीचा ए.सी.ही लुमेवाडी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतला आहे.
इंदापूर शहरातील संजय जनार्धन राऊत यांच्या साई इलेक्ट्रॉनिक दुकानातुन दि.02 डिसेंबर रोजी आरबाज आमीरखान जमादार याने राऊत राऊत दुकानात नसताना कामागाराकडून एक एल जी कंपनीचा ए सी विकत घेतला. मालकाचे खात्यावर फोन पे चे बनावट अँप्लीकेशन वापरुन ए सी ची रक्कम ३६००० रुपये संजय राऊत यांचे नावे पाठवलेचा बनावट ट्रांजेक्शन सक्सेसफुलचा मेसज कामगाराला दाखवला. स्वताचे खोटे नाव सांगून पावती बनवून घेतली आणि फसवणुक करून निघून गेला होता.
दि.03 डिसेंबर रोजी दुकानमालक संजय राऊत यांनी घटना लक्षात आल्यावर इंदापूर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.गुन्हे शोध पथकाने अतिजलद तपासाची सुत्रे फिरवून आरबाज आमीरखान जमादार यास गुन्ह्यात निष्पन केले. त्यास त्याचे राहते घरुन दि.04 डिसेंबर रोजी मौजे लुमेवाडी ता इंदापूर येथून त्याने फसवणुक करुन घेवून गेलेल्या ए सी सह ताब्यात घेतले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास दाखल गुन्ह्यात अटक करणेत आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिरादार,पोलीस उपअधिक्षक सुदर्शन राठोड,पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.उपनिरीक्षक प्रकाश माने, पो.हवा.सलमान खान,पो.काँ विशाल चौधर,पो.कॉ.तुषार चव्हाण,पो.काॅ गणेश डेरे,पो.कॉ.अंकूश माने यांनी केली आहे.
What's Your Reaction?