दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्पेलिंग आली नाही,शिक्षिकेने अमानुष मारहाण केली,दाखल झाला गुन्हा
आय मिरर
दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थाला इंग्रजी शब्दाची स्पेलिंग आली नाही, म्हणून चिडलेल्या एका शिक्षिकेने दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
अंबरनाथच्या साउथ इंडियन शाळेत हा संतापजनक प्रकार घडला असून त्या निर्दयी शिक्षिकेविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असल्याने या शिक्षिकेला जेल ची हवा खावी लागणार आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या साउथ इंडियन शाळेत हा प्रकार घडला.या शाळेत दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला एका इंग्रजी शब्दाचं स्पेलिंग आलं नाही, म्हणून त्याची वर्गशिक्षिका विजयश्री शकेवार हिने त्याच्या पाठीवर आणि पायावर काठीने अमानुषपणे मारहाण केली.
मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर गप्प गप्प असल्यामुळे आईने त्याला जवळ घेऊन विचारपूस केली असता मुलाने शाळेत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर या मुलाच्या आईने अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षिका विजयश्री शकेवार हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
What's Your Reaction?