इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटलांवरील हल्ल्याचा हर्षवर्धन पाटलांकडून निषेध व्यक्त
आय मिरर
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या घटनेची माहिती घेत राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील निषेध केला आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूरच्या तहसीलदारांच्या गाडीवर आज धक्कादायक प्रकारे हल्ला करण्यात आला आहे. तसेच धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना निषेधार्थ आहे. अशी घटना इंदापूरमध्ये याआधी झाली नाही. यामध्ये आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई केली जावी, यासाठी पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.
असले प्रकार कधी खपवून घेतले जाणार नाहीत. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. सरकारी अधिकारी आपल्या परीने काम करत असतात, मात्र अशा प्रकारे हल्ले होत असतील तर हे चुकीचं आहे, असेही ते म्हणाले.
What's Your Reaction?