इंदापुरातून पोलीस हवालदार गायब झाला घरात चिट्ठी सापडली अधिकाऱ्यावर केला गंभीर आरोप

Jun 10, 2025 - 17:32
Jun 10, 2025 - 18:15
 0  2141
इंदापुरातून पोलीस हवालदार गायब झाला घरात चिट्ठी सापडली अधिकाऱ्यावर केला गंभीर आरोप

आय मिरर 

पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे आज सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत.

केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.

मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असं या चिठ्ठीत लिहिलेल आहे.

या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी प्रतिक्रिया दिली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीची तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलीस खात्याकडून या संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जाईल त्यानंतर त्याचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जाईल.त्याने जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांची चौकशी केली जाईल आणि त्यानुसार वरिष्ठांना अहवाल पाठवला जाईल.

विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवलेला आहे आणि माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत असंही या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे.

या संपूर्ण खळबळजनक घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी आपले पती हरवल्याची तक्रार देखील दाखल केली असून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सवाल उपस्थित केला आहे. खात्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देताय, माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करेल असा इशारा ही दिला आहे.

केमदारणे इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते मात्र 27 एप्रिल रोजी त्यांचा इंदापूर पोलीस ठाण्याकडून मुक्त केले होते, भिगवण पोलीस ठाण्याकडे त्यांना रुजू होण्यासाठी कळवण्यात आलं होतं. मात्र केमदारणे हे भिगवण पोलीस ठाण्यात हजर झाले नव्हते. 

यापूर्वी देखील 2021 मध्ये केमदारणे हे इंदापूर मधील शासकीय वसाहतीतील राहत्या घरातून कोणालाही न सांगता बेपत्ता झाले होते,तशी तक्रार देखील इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow