Pune : पुणे हादरलं ! हॉटेलमधील बिल भरण्यावरून दोघात वाद झाला, परमेश्वरने रामच्या कानशिलात लगावली रामने थेट परमेश्वर च्या अंगावर कंटेनर घातला

आय मिरर
पुण्याच्या वाघोली येथील एका वेअर हाऊस समोर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे .यामध्ये हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून चापट मारल्याच्या रागातून कंटेनर अंगावर घालून एकास ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याप्रकरणी रामचंद्र शिवराम पोले वय वर्ष ४४ या ड्रायव्हरने दिलेल्या फिर्यादीवरून राम दत्ता पुरी वय वर्ष २५ या ड्रायव्हर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या घटनेत परमेश्वर देवराये याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राम पुरी याने मित्र परमेश्वर देवराये याच्या सोबत हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात परमेश्वर याने आरोपी राम पुरी याला चापट मारल्याने त्याचा राग मनात धरून आरोपी राम पुरी याने त्याच्या ताब्यातील कंटेनर एम एच १२ डब्ल्यू एक्स ८३०७ हा चालू करून परमेश्वर देवराये याच्या दिशेने भरधाव वेगाने चालून, त्यास धडक देऊन त्याचे अंगावर कंटेनर चालवून त्यास निर्भयतेने ठार मारले.
याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राम दत्ता पुरी यास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती वाघोली पोलिसांनी दिली आहे
What's Your Reaction?






