पुण्याच्या मावळमध्ये तिहेरी हत्याकांड ! तिच्यासह दोन्ही जिवंत मुलांना नदीत फेकलं,वाचा नेमकं काय घडलं 

Jul 23, 2024 - 07:06
Jul 23, 2024 - 07:37
 0  431
पुण्याच्या मावळमध्ये तिहेरी हत्याकांड ! तिच्यासह दोन्ही जिवंत मुलांना नदीत फेकलं,वाचा नेमकं काय घडलं 

आय मिरर

पुण्याच्या मावळ तालुक्यात मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला. आईचा मृतदेह पाहून रडू लागलेल्या दोन्ही मुलांनाही आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्राने नदीत फेकून दिल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे.

याप्रकरणी आता तिचा प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची चौकशी करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. त्या महिलेला तिच्या प्रियकराने गर्भपात करण्यासाठी ठाणे येथे त्याच्या मित्रासोबत पाठविले होते. त्या ठिकाणी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तळेगाव पोलिसांत आरोपीच्या विरोधात विवाहित महिलेच्या मृत्यूस कारणीभूत आणि त्या लहानग्या मुलांच्या जीव घेतल्या प्रकरणी त्यांच्या वर हत्येचा गुन्हा दाखल केला असून या दोन्ही आरोपींना ३० तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या बाबतचा अधिक तपास तळेगाव एम आय डी सी पोलिस करत आहेत. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow