बेकायदा दारु विक्रीवर इंदापूर पोलिसांची कारवाई ; 1 लाख 49 हजार 155 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच असणाऱ्या बाबा चौक परिसरात बिगर परवाना बेकायदेशीर रित्या देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर इंदापूर पोलिसांनी छापा घालत कारवाई केली आहे.या कारवाईत इंदापूर पोलिसांनी तब्बल एक लाख 49 हजार 155 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत एकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक महेश गरड, सहा.फौजदार प्रकाश माने, पो.काॅ. शेख, नागरगोजे हे इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत श्री राम प्राणप्रतिष्ठा बंदोबस्तावर असताना माने यांना इंदापुर शहरातील बाबा चौका जवळ विशाल कोथमिरे यांचे कोथमिरे वाईन शॉपचे शेजारी स्वत:चे राहते घरात अनिल लिला जाधव रा.बाबा चौक इंदापुर हा बेकायदा बिगर परवाना देशी विदेशी दारु विक्री करीत आहे या संदर्भात खाबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती.
त्यानुसार सहा.फौजदार प्रकाश माने यांनी इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांना कळवुन पोलीस उपनिरीक्षक महेश गरड, सहा.फौजदार प्रकाश माने, पो.काॅ. शेख, नागरगोजे यांनी मिळुन सदर ठिकाणी छापा घातला. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख, 49 हजार 155 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत त्याच्या विरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सहा.फौजदार माने करीत आहेत.
What's Your Reaction?






