वीरश्री मालोजीराजे भोसलेंच्या स्मारकाची नासधूस करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ! शिवभक्त आणि शिवप्रेमींची मागणी
आय मिरर(देवा राखुंडे)
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची नासधूस करून विटंबना करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल इंदापूर तालुक्यातील शिवभक्त व शिवप्रेमींनी केली आहे या संदर्भातील लेखी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना देण्यात आले आहे.
इंदापूर नगरपालिका सुशोभीकरणाच्या नावाखाली तीर्थक्षेत्र नरसिंहपुर आराखड्यातील प्रस्तावित निधीमधून साधारणपणे दोन वर्षांपूर्वी इंदापूरच्या पश्चिम बाजूला पुणे सोलापूर बाह्यवळणावर वीरश्री मालोजीराजे भोसले चौकात वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे स्मारक आहे.
सदरचे स्मारक हे इंदापूरच्या पवित्र भूमीला वीरश्री मालोजीराजे यांचे नावाने संपूर्ण देशभरात एक वेगळी ओळख व पावित्र्य प्राप्त झाले आहे. सर्व शिवप्रेमींच्या आस्थेचे हे स्थान असून वीरश्री मालोजीराजे यांचे जगभरातील एकमेव शिल्प या ठिकाणी स्थापित केले आहे.
दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी सदरच्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली संबंधित ठेकेदाराने व सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर येथील अधिकारी यांच्या संगणमताने सदरच्या ठिकाणी स्मारकाची नासधूस केली असून ही अत्यंत गंभीर व जनप्रक्षोभास कारणीभूत ठरणारी अक्षम्य अशी कृती आहे.
सदरच्या कृतीमुळे जाणीवपूर्वक दंगली सारखे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही गोष्ट दोन दिवसानंतर आयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे मंदिराच्या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार मुद्दामून केला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात मुंबईकडे जाणाऱ्या मराठा तरुणाईचा हा एकमेव मार्ग असून नेमके त्याच दिवसाच्या एक दिवस आधी हा प्रकार करणे यामध्ये खूप मोठे षडयंत्र असल्याचा आरोप शिवप्रेमींनी या निवेदनाद्वारे केला आहे.
त्यामुळे संबंधित ठेकेदार, हायवे अथोरिटी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर यांच्यासह सदरच्या निंदनीय घटनेसाठी कारणीभूत असलेल्या सर्वांवर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे,सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक कृती करणे, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाचा खर्च झालेला निधी त्याचा अपव्यय करणे इत्यादी गुन्हे दाखल करून संबंधितांना त्वरित अटक करावी अशी मागणी शिवभक्त आणि शिवप्रेमींनी लेखी निवेदनाद्वारे पोलीस खात्याकडे केली आहे.
अशा अधिकाऱ्यांपासून समाजाला धोका असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यासाठी दिरंगाई अथवा टाळा टाळ झाल्यास सर्व शिवप्रेमी संविधानिक मार्गाने उग्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा सूचक इशाराही पोलीस प्रशासनाला इंदापुरातील शिवप्रेमी आणि शिवभक्तांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
What's Your Reaction?