इंदापूर शहराचा महाब्रॅण्ड शहा ब्रदर्स ! परंपरा विश्वासाची, सर्वोत्तम कपड्यांची,सुयोग्य दराची आणि नाविन्यासह आपलेपणाची

Nov 10, 2023 - 07:40
 0  565
इंदापूर शहराचा महाब्रॅण्ड शहा ब्रदर्स ! परंपरा विश्वासाची, सर्वोत्तम कपड्यांची,सुयोग्य दराची आणि नाविन्यासह आपलेपणाची

आय मिरर

सण-उत्सवाच्या वस्त्र खरेदीसाठी इंदापूर तालुक्यासह बारामती, दौंड, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, माढा, मोहोळ, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड या तालुक्यांतील लोकांची वस्त्र खरेदीसाठी पहिली पसंती इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या शहा ब्रदर्स अँड कंपनीला असते. कारण येथे असते परंपरा विश्वासाची....परंपरा सर्वोत्तम कपड्यांची... परंपरा सुयोग्य दराची....परंपरा नाविन्याची.... परंपरा आपलेपणाची.... इंदापूरच्या शहा ब्रदर्सची...   

गेली अनेक वर्षे शहा ब्रदर्स म्हणजेच विश्वासाचा महाब्रँड म्हणून ओळखला जातो.यंदा नागरिकांमध्ये दिवाळी सणाचा उत्साह वाढलेला आहे. वस्त्रोद्योगात शहा ब्रदर्स हे ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले एक सुसज्ज दालन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी लहानांपासून थोरांपर्यंतच्या सर्वांनाच पसंतीला उतरतील अशा वस्त्रांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.    

उत्साह आणि चैतन्याचा उत्सव असलेला दिवाळी सण यंदा थाटात साजरा होत असताना वस्त्र खरेदीत गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिकतेसाठी ग्राहक शहा ब्रदर्सकडे विश्वासाने येत आहेत. वाजवी किंमत व टिकाऊ पणा यामुळे लोकांच्या पसंतीस शहा ब्रदर्स उतरत आहे. यासह विवाह समारंभ म्हटले की मोठी खरेदी. देण्या-घेण्याच्या पासून वधुपर्यंत सर्वानाच असंख्य प्रकारच्या साड्या येथे उपलब्ध आहेत.    

शहा ब्रदर्सची कै.नारायणदास शहा,वै. गोकुळदास शहा,कै.सुरेशदास शहा यांचेनंतर आता भरत शहा, मुकुंद शहा, युवा उद्योजक अंगद शहा ही चौथी पिढी मोठ्या विश्वासाने तसेच आदराथीत्याने हा व्यवसाय पुढे चालवीत आहे. सण-उत्सवाच्या वस्त्र खरेदीमध्ये वधु-वरांचा संपूर्ण पोशाख, संपूर्ण लग्नबस्ता, सुटिंग शर्टिंग, कीड्स वेअर, रेडीमेड लेडीज वेअर, जेन्ट्स लेडीज होजिअरी, सर्व प्युअर सिल्क साड्या, काठपदर, पैठणी, शालू अशा अनेक वैविध्यपूर्ण वस्त्रांनी सजलेले हे दालन हजारो नाही, तर लाखो ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहे. सण-समारंभाला ठेवणीतील साडया आणि पंजाबी ड्रेस वापरणाऱ्या नव्या पिढीला जीन्स, टी-शर्ट्स आणि अन्य आधुनिक वेस्टर्न बेअर्सच्या भरपूर व्हरायटी रास्त किमतीत उपलब्ध आहेत.   

याठिकाणी ग्राहकांच्या सेवेसाठी भरत शहा, मुकुंद शहा, युवा उद्योजक अंगद शहा,माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, वैशाली शहा यांचेसह सर्व कर्मचारी सदैव तत्पर असतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow