पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यात एस टी चा भीषण अपघात; दोन ठार
आय मिरर
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज नं.१ नजीक एसटी आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.MH13 CU 8125 या क्रमांकाची एस टी ही पुण्याकडून सोलापूर दिशेने निघाली होती.दरम्यान इंदापूर दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर ट्राॅली ला एस टी ने पाठीमागून धडक दिली.या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून गुरुवारी दि.२३ नोव्हेंबर रोजी रात्री ०८ च्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.
महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एस टी ची पुढे निघालेल्या ट्रॅक्टर ट्राॅली ला पाठीमागून जोराची धडक बसली.यावेळी अपघातग्रस्त ट्रॅक्टर हा रस्ता दुभाजकावरती चढला गेला. तर अपघातग्रस्त एस टी ही सर्व्हीस रोड ला रस्ता ओलांडून खाली धावल्याने एका दुचाकीस तिची धडक बसली.तर एस टी मधील काहींना इजा झाली आहे.या अपघातात ट्रॅक्टर ट्राॅलीचे मोठे नुकसान झाले आहे.
घटना समजताचं इंदापूर पोलीस मदत केंद्राचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पासगे,ए.एस.आय.कदम, पोलीस हवा.जगदाळे, दत्तात्रय मदने, पो.हवा.काळे यांसह इतर कर्मचारी, एन.एच.ए.आय.महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तींना एस टी मधून बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचार कामी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
What's Your Reaction?