त्वचा रोग निवारणासाठी इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट आणि कुष्ठरोग तज्ञांचा सल्ला महत्वाचा - डाॅ.नरेंद्र पटवर्धन
आय मिरर(देवा राखुंडे)
त्वचेच्या नखांच्या केसांच्या समस्येसाठी रुग्णांनी अयोग्य टाळून इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट आणि कुष्ठरोग तज्ञांचा IADVL त्वचा सल्ला घेतला पाहिजे.यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळून वेळेत त्वचा रोगांचा समूळ नाश करता येतो आणि त्यापासून मुक्ती मिळवता येते असं प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ.नरेंद्र पटवर्धन यांनी इदापूरात केले.
या हेतूने पुणे ते हैदराबाद अशी जनहितार्थ सायकल रॅलीचे काढण्यात आली असून ही रॅली पुण्याच्या इंदापूर शहरात दाखल झाली तेव्हा इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर व डॉ.महेश रुपनवर यांनी या सायकल रॅलीचे स्वागत केले.इंदापूर शहरातील एका खाजगी हाॅटेल मध्ये हा सन्मान सोहळा पार पडला असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. संजय देशमुख होते.
डॉ.नरेंद्र पटवर्धन यांनी ही जनजागृती रॅलीचे काढण्यापाठीमागील उद्देश स्पष्ट केला.सायकल रॅलीत स्किन रथ(digital van) चा ही सहभाग असून प्रवासादरम्यान शहरातील मुख्य चौकांमध्ये या व्यायांद्वारे त्वचारोगांबद्दल माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचं त्यांनी सांगितले.
या रॅलील अपर्णा महाजन,सविता भाटेवार,स्वप्नाली गुप्ते,जुगल राठी, रवी जोशी,भूषण आपटे,प्रदीप भवालकर, नरेंद्र पटवर्धन,नंदू भाटेवार, प्रकाश कुलकर्णी,नितीन दामले,विश्वनाथ गोखले,अतुल गोपाल आणि अनिल झमटानी आदी डाॅक्टरांनी सहभाग नोंदवला आहे.
या कार्यक्रमास डॉ.थोरवे,डॉ.बिचुकले, डॉ.कांडलकर, व डॉ.रुपनवर उपस्थित होते.सुत्रसंचलन डॉ.अनिल शिर्के यांनी केले.तर आभार डॉ. अविनाश पाणबुडे यांनी मानले.
What's Your Reaction?