इंदापुरात रविवारपासून मालोजीराजे व्याख्यानमाला
![इंदापुरात रविवारपासून मालोजीराजे व्याख्यानमाला](https://imirror.digital/uploads/images/202502/image_870x_67ad976dae07f.jpg)
आय मिरर
इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी रविवार दि.१६ फेब्रुवारी ते मंगळवार दि.१८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर,नेहरू चौक याठिकाणी मालोजीराजे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे.व्याखानमालेचे हे १६ वे वर्षे असलेची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा इंदापूर नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम व कार्याध्यक्ष सुनील गलांडे यांनी दिली.
रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी शिवप्रतिमेचे पूजन व उद्घाटन इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कामधेनू परिवाराचे मार्गदर्शक समाजभूषण डॉ.लक्ष्मणराव आसबे भूषविणार आहेत.
यावर्षीचे प्रथम पुष्प प्रा. प्रशांत देशमुख (मुंबई) हे "जगणं सुंदर आहे.." या विषयावर गुंफणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन भरत शहा, सोनाई परिवाराचे कुमारशेठ माने, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे, पुणे जिल्हा शिवसेना महिला प्रमुख सीमा कल्याणकर, इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप वाघमारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.इनायतअली काझी उपस्थित राहणार आहेत.
सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी द्वितीय पुष्प प्रा.युवराज पाटील (कोल्हापूर) हे "मुलांचे पालक बना,मालक नको." या विषयावर गुंफणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे आहेत.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे,इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, निर्मिती कन्सल्टंट इंजिनिअर अतुल मोरे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किरण गानबोटे, सामाजिक कार्यकर्ते ॲड.सचिन चौधरी,डॉ.ओंकार ताटे उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार दि.१८ फेब्रुवारी रोजी तृतीय पुष्प ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील(मुंबई )हे "शिवरायांच्या जीवनातील अज्ञात व रोमहर्षक घटना.." या विषयावर गुंफणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलसिद्धी उद्योग समूहाचे प्रवर्तक राजेंद्र तांबिले असतील.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते गजानन गवळी, नगरसेवक अमर गाडे, डॉ.सुश्रूत शहा, आशिष बर्गे उपस्थित राहणार आहेत.
व्याखानमालेस इंदापूर शहर व परिसरातील शिवप्रेमींनी तसेच सर्व लहान थोरांनी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार्याध्यक्ष राष्ट्रीय कुस्ती पंच पै.शरद झोळ व सचिव योगेश गुंडेकर यांनी केले आहे.
What's Your Reaction?
![like](https://imirror.digital/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://imirror.digital/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://imirror.digital/assets/img/reactions/love.png)
![funny](https://imirror.digital/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://imirror.digital/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://imirror.digital/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://imirror.digital/assets/img/reactions/wow.png)