तरंगवाडीतील बापू पारेकर यांची इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

Feb 19, 2024 - 18:53
Feb 20, 2024 - 16:09
 0  545
तरंगवाडीतील बापू पारेकर यांची इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

आय मिरर(देवा राखुंडे)

तरंगवाडी येथील बापू जगन्नाथ पारेकर यांची इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

भारतीय जनता पार्टी प्रति असणारी पारेकर यांची निष्ठा व प्रामाणिकपणा पाहून त्यांची भाजपा कडून या पदासाठी निवड करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते मा.मंत्री हर्षवर्धन पाटील मानी यांचे मार्गदर्शनानुसार, सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांचा विश्वास संपादन करून काम करावे. आपण पक्षवाढीसाठी सक्रिय रहावे. पक्षाच्या कामात नेहमी आपला मोठा सहभाग नोंदवावा. पक्षाच्या लहान-मोठ्या बैठका, मेळावे, परिसंवाद, जाहीर सभा यात सहभागन नोंदवावा असं नियुक्तीपत्रात म्हटले आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow