उपोषण सुरू करण्यापूर्वीच जरांगेंना गिरीश महाजनांचा फोन; म्हणाले..
आय मिरर
मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. हा वेळ आज संपला आहे. दरम्यान पुन्हा एकदा आजपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांनी फोन केला आहे. जरांगे पाटील आणि गिरीश महाजन यांचं फोनवर बोलणं झालं.
नेमकं काय म्हणाले महाजन?
गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला. थोडं दिवस थांबा टिकणारं आरक्षण देऊ अशी विनंती महाजन यांनी जरांगे पाटलांना केली आहे. तुमचे तीन ते चार विषय आठवडाभरात मार्गी लावू असं आश्वासन देखील महाजन यांनी जरांगे पाटलांना दिलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. तुम्ही काय मार्ग काढाल ते सांगा, मुख्यमंत्र्यांशी बोला आता थांबणार नाही. उपोषण सुरू झाल्यानंतर कोणत्या नेत्याशीही बोलणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
काय आहे नेमकी मागणी?
मराठी समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र या मागणीला कुणबी आणि ओबीसी समाजामधून विरोध होत आहे. त्यामुळे सरकार हा प्रश्न आता कसा सोडवणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
What's Your Reaction?