इंदापूर शहरात भव्यदिव्य पत्रकार भवन उभारणार : शैलेश काटे 

Feb 2, 2024 - 18:25
 0  292
इंदापूर शहरात भव्यदिव्य पत्रकार भवन उभारणार : शैलेश काटे 

आय मिरर

इंदापूर शहरात येत्या काही दिवसात भव्यदिव्य पत्रकार भवन उभारण्यात येईल, अशी ग्वाही इंदापूर स्वाभिमानी पत्रकार संघांचे अध्यक्ष शैलेश काटे यांनी दिली. बुधवारी (दि.३१) इंदापूर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी स्वाभिमानी पत्रकार संघाची पहिली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

दिवंगत पत्रकार अनंतराव श्यामराव जकाते यांनी सर्वप्रथम सन १९८४ साली इंदापूर येथे पत्रकार भवन उभारण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी शासनाकडे केली होती. परंतु मागणी कडे दुर्लक्ष केले गेले. याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतू पत्रकार भवनाचा विषय अध्याप प्रलंबित आहे. त्यामुळे पत्रकार भवनाचा विषय तडीस नेणार आहे. काही दिवसात शहरात पत्रकार भवनाची भव्य-दिव्य इमारत तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या सहकार्याने उभारली जाईल. अशी माहिती काटे यांनी दिली.

पत्रकार भवन व ऐन वेळेच्या विषयांवर स्वाभिमानी पत्रकार संघाची बैठक येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी ज्येष्ठ पत्रकार शैलेश काटे, महेश स्वामी, राहुल ढवळे, कैलास पवार, सुरेश मिसाळ, सिद्धार्थ मखरे, संतोष भोसले, इम्तियाज मुलाणी, धनंजय कळमकर, नीलकंठ भोंग, शिवाजी शिंदे, दीपक खिलारे, आदित्य बोराटे, नानासाहेब लोंढे, जितेंद्र जाधव, मुक्तार काझी, प्रकाश आरडे, अशोक घोडके, दत्तात्रय मिसाळ, अतुल सोनकांबळे, राकेश कांबळे, हमीद आतार, देवराज जगताप, संतोष मोरे व इतर उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० साली सुरु केलेल्या 'मूकनायक' या मराठी भाषेतील पाक्षिकाला १०४ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या वतीने पहिल्या अंकाचे वाचन करून हा दिन साजरा करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow