नागनाथ लकडे यांचा भिगवण मध्ये सत्कार ; करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध निवड

Sep 27, 2023 - 18:02
 0  927
नागनाथ लकडे यांचा भिगवण मध्ये सत्कार ; करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध निवड

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याविषयी संपूर्ण करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर 26 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडीनंतर तालुक्यातील प्रमुख चारही गट एकत्र आणण्यासाठी विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी मध्यस्थी केल्यानी ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून भटक्या विमुक्त जाती जमाती मधून कात्रज येथील माजी सरपंच नागनाथ गणपत लकडे यांची वर्णी लागली. या राखीव मतदारसंघातून तब्बल नऊ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती शिवाजी बंडगर त्याचप्रमाणे करमाळा पंचायत समितीचे मा. सभापती बापूसाहेब पाटील यांचा समावेश असल्याने या जागेसाठी चुरस निर्माण झाली होती. परंतु अखेरच्या क्षणी या दोन्ही नेत्यासह इतर सहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने नागनाथ लकडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

नागनाथ लकडे यांनी कात्रज ग्रामपंचायतचे 2002 ते 2007 या कालावधीत सरपंचपद भूषवले होते. तालुक्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून परिचित असल्याने 2007 साली त्यांना जगताप गटाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीची उमेदवारी देण्यात आली होती त्या निवडणुकीत ते प्रचंड मताने निवडून आले होते. त्यानंतर 2017 साली पत्नी मंदाकिनी नागनाथ लकडे यांना केतुर पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती व या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या.या निवडीनंतर नागनाथ लकडे यांचा भिगवण येथील हॉटेल आनंद येथे त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर बोलताना नागनाथ लकडे यांनी सांगितले की माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून भविष्यात करमाळा बाजार समितीचा नावलौकिक वाढवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक राजेंद्र धांडे, इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक विष्णुपंत देवकाते, मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक नंदकुमार भोसले, टाकळीचे मा. सरपंच डॉ. गोरख गुळवे,मा. उपसरपंच आजिनाथ लाळगे कात्रजचे मा. सरपंच शंकरराव माने, सोसायटी संचालक महादेव लकडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow