इंदापूर तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींना विकास कामासाठी शेती महामंडळाची जागा द्यावी - हर्षवर्धन पाटील

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीना विविध सार्वजनिक विकास कामांसाठी शेती महामंडळाच्या ताब्यातील जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या अध्यक्षेतेखाली महत्वाची बैठक तातडीने आयोजित करावी, या मागणीचे पत्र भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोमवारी दिले.
वालचंदनगर, कळंब, जंक्शन, आनंदनगर, अंथुर्णे, लासुर्णे, रणगाव आणि निमसाखर या ग्रामपंचायतींनी सार्वजनिक विकास कामांसाठी आपल्या विभागाकडील शेती महामंडळाच्या ताब्यातील शासनाच्या मालकीच्या जागांची मागणी केली आहे. तरी या संदर्भात आपण तातडीने बैठक लावून ग्रामपंचायतींना जागा उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे, असे हर्षवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
What's Your Reaction?






