सरडेवाडीत जागतिक दिव्यांग दिन साजरा

Dec 4, 2023 - 16:48
 0  221
सरडेवाडीत जागतिक दिव्यांग दिन साजरा

आय मिरर

सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.तसेच महाराजा यशवंतराव होळकर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन सरपंच सिताराम जानकर व उपसरपंच रविंद्र सरडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवाचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला, तसेच ५% दिव्यांग कल्याण निधीचे वाटप करण्यात आले.

यावेळी सतीश चित्राव,हनुमंत जमदाडे,गोकुळ कोकरे,प्रियंका शिद,विजय शिद,वैशाली शिद,सुप्रिया कोळेकर,वैशाली कोळेकर,शिवाजी माने,गयाबाई तोबरे,नामदेव तोबरे,अलका कडाळे,ग्रामसेविका स्वाती चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरपंच जानकर म्हणाले की, ग्रामपंचायत स्व-उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दरवर्षी ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना वितरित केला जातो,दिव्यांग बांधवांनी कुठल्याही प्रकारचा न्युनगंड मनात न ठेवता समाजात वावरले पाहिजे.

उपसरपंच रवींद्र सरडे म्हणाले की,शासन दिव्यांगासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते,ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या सर्व योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

यावेळी अतुल ढावरे,रूपाली गायकवाड,राजेंद्र गायकवाड, कोमल शिद,हनुमंत देवकर,युवराज देवकर,सुरवंता हरणावळ, अमोल काळे,हनुमंत लोंढे,महेश शिद,ज्ञानेश्वर शिद,अनिल भगत, वामन जमदाडे,शरद लोंढे,मंगल जाधव, पांडुरंग हरणावळ, हरणावळ,तात्यासो जमदाडे,अलका शिंदे,किशोर कडाळे, जीवन लोंढे या दिव्यांग लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.आभार ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow