एल.जी बनसुडे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापन दिन उत्साहात संपंन्न

Jan 20, 2024 - 17:54
 0  172
एल.जी बनसुडे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापन दिन उत्साहात संपंन्न

आय मिरर

पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी बनसुडे विद्यालयात (दि.16)रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापन दिन पार पडला या वेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या विद्यालयात राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे एस. के. एस रेम्बो पब्लिक स्कूल (हवेली) च्या अध्यक्षा भारती सातव यांनी सांगितले.

विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम घेतले जातात हे उपक्रम नेहमी प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो असे मत रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ कुबेर यांनी व्यक्त केले. 

वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भारती सातव व नागनाथ कुबेर यांच्या हस्ते झाले.प्राचार्या वंदना बनसुडे यांनी आपल्या प्रस्ताविकेतून 22 जून 2012 शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थी वाढ व प्रगती कशी होत गेली.तसेच JEE,CET,NEET, Foundation यासारखे कोर्स घेतले जातात याविषयी मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान नागनाथ कुबेर यांनी भूषवले त्यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगती बद्दल कौतुक केले व पालकांना विद्यार्थ्यी जडणघडणी बाबत मार्गदर्शन केले.तसेच त्यांनी सायकल बक्षीस स्वरूपामध्ये भेट दिली.संस्थेचे संस्थापक हनुमंत बनसुडे यांनी आपल्या मनोगतातून शाळेत घेण्यात येत असलेले उपक्रम त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात केलेली नाविन्यपूर्ण कामगिरी याबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच क्रीडाशिक्षक सागर बनसुडे यांचे कौतुक केले. 

स्नेहसंमेलनात प्रामुख्याने मराठमोळी गीते, महाराष्ट्राच्या पारंपारिक लावण्या,देशभक्तीपर गीते, शैक्षणिक संदेशावर आधारित गीते,शिवराज्याभिषेक ,कोळी गीते, फनी सॉंग असे सादरीकरण करण्यात आले.यामध्ये एकुण ९०० पैकी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या कलेला दाद देत उपस्थितांनी बक्षिसांचा वर्षाव केला त्यातुन २५००० रुपये जमा झाले असे मुख्याध्यापक राहुल वायसे यांनी सांगितले. 

यावेळी भारती सातव, नागनाथ कुबेर , संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे , कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, शिक्षण विस्तार अधिकारी हनुमंत शिंदे ,सदस्य प्रदीप काळे, विशाल बनसुडे, सरपंच आजिनाथ पवार, उपसरपंच कैलास भोसले, इंदापूर तालुका ज्युदो कराटे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे, विश्वस्त हनुमंत मोरे, बाबा बनसुडे,रोहित सर,ज्ञानेश्वर सर,तात्याराम पवार,अंकुश बनसुडे, कोमल बनसुडे, सुभाष बनसुडे, रितेश लोणकर, किरण काळे, जयश्री शेलार, रामदास बनसुडे, इंद्रायणी मोरे व पुष्पलता काळे आदीसह आजी-माजी सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत पळसदेव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन प्रविण मदने यांनी केले आभार तेजस्विनी तनपुरे यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow