'एक मराठा लाख मराठा' म्हणत इंदापूरच्या सराटीत निरा नदीत जलसमाधी आंदोलन
आय मिरर
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याने संपूर्ण राज्यात त्याचे तीव्र प्रडसाद उमटू लागले आहेत.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या सराटी गावात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नीरा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आलेय. हातात भगवे झंडे घेत एक मराठा लाख मराठा अशी जोरजोरात घोषणाबाजी करत मराठा समाज बांधवांनी नदीच्या पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
What's Your Reaction?