बोगद्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण पोहोचलो काही तासात तोडगा निघेल, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपसभापती नीलम गोर्हेंची इंदापूरात मोठी प्रतिक्रिया
आय मिरर
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांनी इंदापूर मध्ये मोठी प्रतिक्रिया दिलीय. बोगद्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण पोहोचलो आहोत काही तासात यामध्ये तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया नीलम गोर्हे यांनी इंदापुरात दिलीय.
कोणावरही अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने खुप प्रयत्न केले आहेत.जर कायदेशीर संकट निर्माण होणार नसतील तर जी.आर मध्ये सरकार निश्चित दुरुस्ती करेल.समाजातील जे उपेक्षित आहेत त्यांना न्याय मिळावा हाच सरकारचा प्रयत्न आहे. बोगद्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण पोहोचलो आहोत काही तासात यामध्ये तोडगा निघेल असं नीलम गोरे यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की,मराठा आरक्षणाचा विषय संपूर्ण देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अगर एकनाथ शिंदे कोणीही मुख्यमंत्री असो सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाला अनुकुलताचं दाखवलीय.मराठा आरक्षणासाठी काय निकष असावेत याबाबत मी स्वत: नागपूर अधिवेशनात सभागृहात बोलली आहे.
एक प्रश्न महाराष्ट्रात दुर्लक्षित राहिला होता. जे कुणबी मराठा म्हणून ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ते दाखले मिळण्याबाबत सर्वदूर त्याची अंमलबजावणी होत नव्हती.याकडे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून लक्ष वेधले गेलेय. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्रीय स्तरावर त्याची अंमलबजावणी झाली आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक भुमिका घेतली पाहिजे असा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर झाला आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यामध्ये घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
What's Your Reaction?