बिग ब्रेकिंग || मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षणासाठी इंदापूरात एक दिवसीय बंदची हाक
आय मिरर
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळु लागल्याने राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटु लागले आहेत. मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये देखील कडकडीत बंद पाळला जाणार आहे.
व्यापारी, हॉटेल, व्यवसायिक व इतर छोटे मोठे व्यापारी देखील स्वयस्फुर्तीने या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.इंदापूर शहरात एकदिवसीय बंदचे फलक लावण्यात आले आहेत.मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून इंदापूर शहरात स्वयंपूर्ण अनेक जण बंदचे फलक आपल्या दुकानांवर लावून या बंदमध्ये सहभागी होताना दिसून आले.
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली असून सोमवारी अनेक ठिकाणी जाळपोळ, रास्ता रोको करण्यात आले.इंदापूर शहरात प्रशासकीय भवना समोर साखळी उपोषण व आमरण उपोषणाला विविध संघटणांनी पाठिंबा दर्शविला असून सोमवारी इंदापूर वकील संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये आंदोलक आमरण उपोषणाला बसले आहेत. तर काहींनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे.तर काही गावात कॅन्डल मार्च देखील काढण्यात आले आहेत.दिवसागणित आंदोलनाची तीव्रता वाढत असून सरकारने लवकरात लवकर आरक्षणाची ठोस भूमिका जाहीर करावी अशी मागणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.
What's Your Reaction?