स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ! इंदापूर पोलिस स्टेशन येथील दोन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस

आय मिरर
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इंदापूर पोलिस स्टेशन येथिल दोन घरफोडी चोरी चे गुन्हे उघडकीस आणले आहेत याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ज्ञानेश्वर उर्फ माऊली गुंदवण्या शिंदे वय 40 वर्ष राहणार सरस्वती नगर इंदापूर जिल्हा पुणे याला ताब्यात घेतले असून अधिक तपास कमी त्याला इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला इंदापूर पोलीस स्टेशन येथील घरफोडीचे गुन्हे हे ज्ञानेश्वर शिंदे याने केले असून सदरचा इसम हा सरस्वतीनगर इंदापूर येथे असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने इंदापूर पोलीस ठाण्या अंर्तगत दाखल असलेले दोन गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सदर गून्ह्यातील मोबाईल पंचनाम्याने जप्त करुन घेऊन. त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करणे कामी इंदापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.हवा. शुभांगी खंडागळे या करीत आहेत.
सदरची कारवाई सो अंकित गोयल पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पो.निरिक्षक कुलदीप संकपाळ,पो.उपनिरीक्षक अमित शिद पाटील,सहा.फौ. बाळासाहेब कारंडे,रविराज कोकरे,पो. हवा. राजू मोमीन, विजय कांचन,अभिजीत एकशिंगे,स्वप्निल अहिवळे,अतुल डेरे,पो.ना.निलेश शिंदे यांनी केली आहे.
What's Your Reaction?






