दौंड मधील आठवड्यातील दुसरी घटना ! अनैतिक संबंधातून जावयाने सासर्‍याला संपवलं

Aug 9, 2024 - 11:30
 0  497
दौंड मधील आठवड्यातील दुसरी घटना ! अनैतिक संबंधातून जावयाने सासर्‍याला संपवलं

आय मिरर

दौंड मध्ये जावयाने सासऱ्याचा चाकू बुकसून खून केल्याची धार घटना घडली आहे आठवडाभरात कोणाची दुसरी घटना घडल्याने दौंड तालुका हादरला गेलाय. सासऱ्याने जावयाला माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध का ठेवतो याचा जाब विचारला आणि याच्यातून चिडलेल्या जावयाने थेट सासऱ्याच्या छातीत चाकू बॉक्सून त्याचा खून केल्याची घटना दौंड तालुक्यातील बोरीबेल मध्ये घडली आहे.सुदाम हिऱ्या चव्हाण रा. बोरीबेल, ता. दौंड अस खून झालेल्या सासऱ्याचं नाव आहे. तर लकझऱ्या कोब्या काळे रा. लासुर्णे, ता. इंदापूर याच्यावर दौंड पोलिसांनी सासऱ्याच्या खूना प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दि.03 आँगस्ट रोजी दौंड तालुक्यातील खामगांव मध्ये सूरज राहुल भुजबळ या तरुनाचा धारधार कोयत्याने वार करीत खून झाला होता. ही घटना ताजी असतानाचं दौंड मध्ये आता आणखी एक खूनाची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्या पत्नीशी जावयाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आहे.सुदाम चव्हाण यांना होता. त्यांचे जावाई लकझऱ्या कोब्या काळे हे आपल्या सासरवाडीत बोरीबेल येथे आलेला असताना त्याच्यात आणि सासरे सुदाम चव्हाण यांच्या यावरुन वाद झाला.यावेळी संतापलेल्या जावयाने थेट सासऱ्याला चाकूने भोसकले. सुदाम चव्हाण बेशुध्द पडल्याने नातेवाईकांनी जखमी झालेल्या चव्हाण यांना तात्काळ दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपचारकामी दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितले.आरोपी लकझऱ्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow