उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं म्हणून एकनाथ शिंदेंची पक्षातील नेत्यांकडून मनधरणी ?
आय मिरर
राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तर राज्याचं उपमुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना मिळणार असल्याचं बोललं जातं आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत अशा चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर ते देखील तुम्ही घ्यावे अशी मागणी केली आहे.
त्यानंतर आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का अशा चर्चा आहेत. पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेच्या बाहेर न राहता सत्तेत राहून सरकार चालवावे, शिवसेना नेत्यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे. तसेच जर उपमुख्यमंत्री पद देण्यात आले, तर ते देखील तुम्ही घ्यावे अशीही मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांचा देखील मागणीला सकारात्मक प्रतिसाद असल्याचं बोललं जातं आहे. काल पत्रकार परिषदेनंतर तसेच आज देखील दिल्लीला जाण्याच्या आधी काही महत्त्वाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती अशी माहिती समोर आली आहे.
What's Your Reaction?