सत्तेसाठी एकत्र आलेले जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत - खा.निलेश लंके
आय मिरर
विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून राजकारण शिगेला असतांना एकनाथ शिंदे हे गावी गेल्याने महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी महायुतीवरच निशाणा साधला आहे. सत्तेसाठी एकत्र आलेले जास्त काळ एकत्र राहू शकत नाही आणि त्यामुळे या निवडणुकीत भाजपाच्या जास्त जागा आल्याने तेही कोणाचे ऐकणार नाही असं सांगत खासदार निलेश लंके यांनी महायुतीवरच निशाणा साधला आहे. लंके यांची पत्नी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आज पारनेर मतदार संघात त्यांनी आभार मेळावा घेतला यावेळी त्यांनी बोलतांना निशाणा साधला आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी ई व्ही एम पडताळणीसाठी अर्ज दाखल केला. मात्र ई व्ही एम पडताळणी म्हणजे उमेदवारांना फक्त मशीनचे डेमो दाखविले जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेचे बडगुजर यांनी पडताळणीसाठी भरलेले शुल्क देखील परत घेतले आहे. बडगुजर यांनी भरलेले शुल्क परत घेतल्याने यावर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आजपर्यंत ईव्हीएम बाबत राजकीय लोकांना शंका होती मात्र आज शेतमजूर करणाऱ्यां सामान्य लोक देखील ईव्हीएम वर शंका घेत असल्याने निवडणूक आयोगाने न्यायालयसमोर मांडून जनतेच्या आणि उमेदवारांच्या शंका दूर करण्याची गरज आहे आणि त्याला न्यायालयाने देखील परवानगी दिली पाहिजे. खरंतर निवडणूक आयोगाने जर पारदर्शक काम केलं असेल तर जनतेसमोर येऊ द्या अशी प्रतिक्रिया आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी दिली आहे.
पारनेर मतदार संघातून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील 18 बूथवरील मतमोजणीचीं पडताळणी करण्याची मागणी करत अर्ज दाखल केला आहे.
What's Your Reaction?