निमगांव केतकी परिसरात परीक्षा काळात सुरळित वीज पुरावठा करण्याची मनसे विद्यार्थी सेनेची मागणी
आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी परिसरात दहावी बारावीच्या परीक्षा काळात महावितरण ने सुरळित वीज पुरावठा करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेनी केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निमगांव केतकी महावितरणचे सहायक अभियंता समीर निगडे यांना शनिवारी दि.१७ फेब्रुवारी रोजी निवेदन दिले आहे.
यावेळी विद्यार्थी सेनेचे राजू भोंग, मनोज हेगडे, किरण भोंग, सौरभ डोंगरे, स्वागत भोंग, शशी भोंग, अंबादास जगतात, किरण डोंगरे, गौरव भोंग, महेश भोंग, ओंकार शेंडे, प्रतिक मिरगणे, महेश भोंग, रोहित भोंग, तुषार भोंग, मनोज जंगम, विशाल भोंग उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून निमगाव केतकी आणि परिसरात सुरळित वीज पुरवठा होत नाही.त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. असं असताना सध्या बारावीच्या मुलांची परीक्षा सुरु आहे तर उद्यापासून दहावीच्या मुलांची परीक्षा सुरु होत आहे. आपल्याकडे सुरळित वीज पुरवठा होत नाही सतत वीज पुरवठा खंडीत होत आहे. सध्या परीक्षांचे दिवस आहेत रात्री अचानकपणे वारंवार वीज खंडीत होत आहे, वीज गेली तर तासंतास येत नाही.अशावेळी आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवरील दहावी-बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्षभर कितीही अभ्यास केला असला तरी परीक्षाला जाण्यागोदर त्या अभ्यासाची उजळणी झाली तरच त्या अभ्यासाच्या परीक्षेला उपयोग आहे.अशा परीक्षेच्या काळात सलग आणि सुरळीत वीजपुरवठा झाला तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच होईल.यासाठी या काळात महाविरणने सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
What's Your Reaction?