महारुद्र पाटलांची घरवापसी, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)च्या कार्याध्यक्षपदी निवड

Oct 18, 2023 - 17:30
Oct 18, 2023 - 17:31
 0  930
महारुद्र पाटलांची घरवापसी, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)च्या कार्याध्यक्षपदी निवड

आय मिरर

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी महारुद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे तसे नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष यांनी महारुद्र पाटील यांना दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खा शरद पवार व उपुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाच्या निवडी झाल्यानंतर आता खा शरद पवार गटानेही जातीय समीकरणे साधत तालुका अध्यक्षपदी धनगर समाजाचे कार्यकर्ते तेजसिंह पाटील यांना संधी दिली असून कार्याध्यक्ष पदी अनुभवी असलेले महारुद्र पाटील यांची निवड केली आहे.

यावेळी बोलताना महारुद्र पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे हात बळकट करण्यासाठी आगामी काळात इंदापूर तालुक्यात संघटना वाढीचे प्रयत्न करणार आहे, पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow