केंद्राने कांदा निर्यातीवर आकारलेले शुल्क मागे घ्यावे - खा.सुळेंची मागणी,शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन सुप्रिया सुळे इंदापूर तहसीलवर दाखल
आय मिरर
खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरचे आहेत. इंदापूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर दूध आणि कांदा तसेच अन्य शेतमालाचे दर गडगडले आहेत. दरासाठी इंदापूर तहसीलदारांना त्यांनी पत्र दिले आहे.कांद्यावर शेतकऱ्यांना सरकारने निर्यात शुल्क लावले आहे. ते निर्यात शुल्क मागे घ्यावे अशी देखील मागणी या पत्राद्वारे सरकारला केली आहे. तसेच शेतमालाचे दर वाढवावे अशी पत्रातून मागणी केली आहे.यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यामध्ये दुध, सोयाबीन, कापूस, कांदा दर गडगडले असून दुष्काळी परस्थितीमध्ये दुधाचे दर वाढवून द्यावेत व केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ८०० डॉलर आकारले असुन ते त्वरीत रद्द करुन दुध व इतर शेती उत्पादन मालांचे दर वाढवून द्यावेत ही प्रमुख मागणी सुप्रिया सुळे यांसह शेतक-यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थीती असून शेतकऱ्यांकडे जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठया प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याचे दर गगणाला भिडले असून सध्या महाराष्ट्रामध्ये दुधाचे दर कमी झाले आहेत.शेतकऱ्यांना जगण्यासाठी दुधाचा जोड धंदा महाराष्ट्रामध्ये मोठया प्रमाणानात असून शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये शासनाने मदत करणे गरजेचे आहे.शासनाने दुधाचे दर वाढवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
दरम्यान इंदापुरातील तहसील कार्यासमोर मराठा बांधव साखळी उपोषणाला बसले आहेत. या उपोषण स्थळी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली.
सुळे म्हणाल्या की, 15 वर्ष मला संसदेत काम करण्याची संधी मिळाली.मी मतदारसंघात येत असते त्यानुसार मी आज इंदापूरला आली आहे.जेव्हा पासून हे सरकार आले आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे.आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सरकार म्हणाले होते.ट्रिपल इंजिन सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.पहिला यू टर्न सरकारला शेतर्कर्यांनी घ्यायला लावला.हे सरकार असंवेदनशील आहे.त्यांच्या कॅबिनेट मध्ये भांडण होत आहेत असा आरोप ही सुळे यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की, सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी आमची मागणी आहे.ट्रिपल इंजिन सरकारने लोकांची कामे करावीत.हर्षवर्धन पाटील आणि आमचे अनेक वर्षांचे संबंध आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी आधी कामे केली आहेत. आमची लढाई राजकिय आहे ती वयक्तिक नाही. अनेक भाजपच्या लोकांशी आमचे संबंध आहेत असं सुळे यांनी म्हटले.
देशात लोकशाही राहिली आहे की नाही? लोकशाही टिकावी यासाठी इंडियाची स्थापना झाली. इंदापुरात दबाव पाहायला मिळतो आहे. पत्रकारावर देखील दबाव आणला जातो.उसाला दर मिळावा यामागणीसाठी आंदोलन सुरू आहे त्याचा विचार ट्रिपल इंजिन सरकारने करायला हवा.सत्तेत आहेत ते समाजात भांडणे लावतात हे दिसते आहे. कॅबिनेट मध्ये भांडणे होत आहे. यात जनतेचे नुकसान होत आहे.105 भाजचे आमदार आहेत. त्यातल्या भाजपच्या किती लोकांना महामंडळ मिळाली असा सवाल ही सुळे यांनी यावेळी विचारला आहे.
What's Your Reaction?