प्रशांत गलांडे पाटलांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
आय मिरर(देवा राखुंडे)
प्रशांत गलांडे पाटलांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रशांत गलांडे पाटील यांची ही नियुक्ती केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, संदेश देवकर ,सचिन खामगळ,सागर बनकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील दोन दिवसापूर्वी गंगावळण ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच निकिता प्रशांत गलांडे पाटील यांसह उपसरपंच आणि काही ग्रामपंचायत सदस्यांनी व सोसायटीचे चेअरमन यांनी भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता आणि त्यानंतर मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी प्रशांत गलांडे पाटील यांची बारामती लोकसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,मंत्री दिलीप वळसे-पाटील,आमदार दत्तात्रय भरणे,युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे,आचार-विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न करावा असं जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
यापूर्वी प्रशांत गलांडे पाटील यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.यासोबतच हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. प्रशांत गलांडे पाटील यांच्या सुविद्य पत्नी गंगावळण ग्रामपंचायतच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत.मात्र त्यांनी भारतीय जनता पार्टी मधून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये पक्षप्रवेश केला असून या नव्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस कडून ताकद देण्याचा प्रयत्न केला जातोय.
What's Your Reaction?