उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं सपत्नीक कुलदैवत श्री लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन
आय मिरर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपूर येथे कुलदैवत श्री.लक्ष्मी नरसिंहाचे सपत्निक दर्शन घेत अभिषेक केलाय.
मी वारंवार दर्शनाकरिता आणि आशीर्वाद घेण्याकरिता याठिकाणी येत असतो. मध्यंतरीच्या काळात बराच कालावधी गेला येता आलं नव्हतं,त्यामुळे या ठिकाणी येण्याची एक ओढ होतीच. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज विठुराया चरणी पूजेचा योग आला. मला असं वाटतं की श्री लक्ष्मी नरसिंह भगवान हे सर्वज्ञ आहेत त्यामुळे त्यांच्याकडे काही मागाव लागत नाही ते सर्व इच्छा पूर्ण करतात अशी प्रतिक्रिया यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
श्री लक्ष्मी नरसिंह मंदीर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी या मंदीराच्या विकास आरखड्यासाठी निधी मंजूर केला होता.आज कार्तिकी एकादशी निमित्त देवेंद्र फडणवीस सपत्निक पंढरपूर वरुन येताना नरसिंहाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी होम हवन करत अभिषेक केला.
यावेळी त्यांच्या सोबत माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दत्तात्रय भरणे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे,आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
What's Your Reaction?