Baramati संतापजनक | वाढदिवसाचं गिफ्ट देण्याचं बहाणा करून बोलावलं दोघांनी बळजबरीने अत्याचार केला

Jul 3, 2025 - 06:12
Jul 3, 2025 - 06:13
 0  1194
Baramati संतापजनक | वाढदिवसाचं गिफ्ट देण्याचं बहाणा करून बोलावलं दोघांनी बळजबरीने अत्याचार केला

आय मिरर 

बारामती तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर जिवे मारण्याची धमकी देत दोघाजणांनी बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.एक जून 2025 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाघळवाडी मध्ये ही घटना घडली असून या घटनेसंदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दादा ऊर्फ ऋतिक वायकर रा.करंजेपुल ता.बारामती आणि बाळा ऊर्फ दयानंद होळकर रा.होळ ता.बारामती अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलीचा एक जून 2025 रोजी वाढदिवस होता. त्यादिवशी दादा ऊर्फ ऋतिक वायकर याने फिर्यादीला फोन करून तुला वाढदिवसाचे गिफ्ट दद्यायचे आहे तु लोखंडी पुलाचे पलीकडे ये असे सांगुन बोलावुन घेतले.

फिर्यादी अंधारात लोखंडी पुलाचे पलीकडे गेलेनंतर दादा ऊर्फ ऋतिक वायकर याने वाढदिवसाचे दिवशी फिर्यादी मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तु जर कोणाला सांगितले तर तुला खल्लास करून टाकीन अशी धमकी ही दिली.

बाळा ऊर्फ दयानंद होळकर यानेही फिर्यादी घरी एकटीच असताना घरामध्ये जबरदस्तीने घुसुन ओरडू नये म्हणून तोंड दाबुन जबरदस्तीने शरीरसंबंध केले.ती गोष्ट कोणाला सांगितली तर तुझे भावाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

याशिवाय दादा ऊर्फ ऋतिक वायकर याने फिर्यादीला जबरदस्तीने त्याचा मित्र सनी यादव रा.वाघळवाडी ता.बारामती यांचे घरी नेले त्यावेळी त्याचे घरी कोणी नसताना त्यांचे घराचे दरवाज्यास आतुन कडी लावुन जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. हा प्रकार कोणास सांगु नको जर सांगितला मी तुझे वाटोळे करेन तुझे लग्न होवु देणार नाही. तसेच तु जर हा प्रकार पोलीसांना सांगितला तर मी जेलमधुन सुटलेवर तुला व तुझे घरातील एकालाही जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. अशा आशियाची तक्रार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow