महाराष्ट्र राज्य डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी बेलवाडीचे शहाजी शिंदे,हर्षवर्धन पाटील यांनी केला सन्मान 

Dec 19, 2023 - 16:15
 0  657
महाराष्ट्र राज्य डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी बेलवाडीचे शहाजी शिंदे,हर्षवर्धन पाटील यांनी केला सन्मान 

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील शहाजी धोंडिबा शिंदे यांची महाराष्ट्र राज्य डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडी झाली आहे. या निवडीनंतर माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे मंगळवारी (दि.19) शिंदे यांचा सत्कार करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

शहाजी शिंदे हे दूधगंगा सहकारी दूध संघ इंदापूरचे माजी चेअरमन आहेत. डेअरी असोसिएशनच्या पुणे येथे दि. 12 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत शहाजीराव शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहाजी शिंदे यांच्या आजपर्यंतच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे दुग्ध व्यवसायास होईल, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले. 

यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार, सहकार महर्षी शंकरराव मोहित पाटील कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश मेहेर, विजय पवार, संजय पवार, अरविंद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow