निरा भिमा कारखान्याच्या मिल रोलर चे पूजन

Sep 9, 2023 - 18:54
Sep 9, 2023 - 18:55
 0  348
निरा भिमा कारखान्याच्या मिल रोलर चे पूजन

आय मिरर

शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी ऊस गळीत हंगाम सन 2023-24 साठीच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि.9 ) करण्यात आले.          

कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गळीत हंगामात कारखाना 6.5 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी व्यक्त केला. याप्रसंगी संचालक राजवर्धन पाटील यांनी कर्मचारी वर्गाशी संवाद साधला व ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. 

या कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, जबीन जमादार, तानाजी नाईक, कार्यकारी संचालक हेमंत माने, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow