बंडगार्डन मधून एक लाख हून अधिकचा विसर्ग,उद्या दुपारपर्यंत उजनी धरण येणार प्लस मध्ये

Jul 25, 2024 - 10:35
 0  3806
बंडगार्डन मधून एक लाख हून अधिकचा विसर्ग,उद्या दुपारपर्यंत उजनी धरण येणार प्लस मध्ये

आय मिरर

भीमा खोऱ्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले असून इतर धरणं देखील जवळपास भरली आहेत. या धरणांमधून सध्या विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने आता दिलेल्या आकडेवारीनुसार बंडगार्डन मधून एक लाख 5538 क्यसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत अवघ्या काही तासात दौंड बंधाऱ्यातून भीमा नदी पात्रात एक लाख हुन अधिकचा विसर्ग होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

सध्या चाळीस हजारहून अधिकचा विसर्ग दौंड बंधाऱ्यातून भीमा पात्रात सुरू आहे. संध्याकाळपर्यंत हा विसर्ग एक लाखाहून अधिक होईल आणि उद्या दुपारपर्यंत मायनस असणारं उजनी धरण हे प्लस मध्ये येईल असा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

सध्या उजनी धरणात 55 टीएमसी हून अधिकचा पाणीसाठा झालाय आणि उजनी धरण हे प्लस मध्ये येण्यासाठी केवळ सात ते सव्वा सात टीएमसी पाण्याची गरज आहे. प्रशासनानं मोठ्या प्रमाणात उजनीत पाण्याची आवक होत असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow