जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा
आय मिरर
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा आहे.आजपासूनचं मोठ्या संख्येने भाविक जेजुरीत दाखल झाले आहेत.महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा उद्या सोमवारी भरणार असून, उद्या सकाळी 11 वाजता खंडोबा देवाच्या पालखीचा प्रस्थान कऱ्हा नदीकडे होणार आहे. अंदाजे सायंकाळी साडेचार ते पाच वाजता कऱ्हा नदीवर श्री खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना धार्मिक वातावरणात स्नान घालण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून कऱ्हा नदीमध्ये पाणी नव्हतं यावर्षी मात्र कऱ्हा नदीला तुडुंब पाणी आहे.उद्या दिवसभर अमावस्या असल्यामुळे आजपासूनच हजारांच्या संख्येने सोन्याच्या जेजुरीत भक्तगण दाखल झालेत.श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे उद्या ही गर्दी अधिक वाढेल असा अंदाज आहे.जवळपास राज्यभरातून साडेपाच ते सहा लाख भाविक येतील असा अंदाज आहे.
पालखी बरोबर जाणारे खांदेकरी सेवेकरी मानकरी भाविकांसाठी नाश्त्याची सोय शिवाय येताना विविध ठिकाणी जेवणाची सुविधा देखील देवस्थान कडून करण्यात आल्याचं मंदीराचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितले आहे. यासोबतच पालखी जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची डागडुजी देखील मार्तंड देवस्थान कडून करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
What's Your Reaction?