मोठी बातमी ! सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या इंदापूर बंदची हाक इंदापूर पंचायत समिती समोर होणार रास्ता रोको
आय मिरर
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षण या मागणीसाठी उपोषणांस बसलेल्या मराठा तरूणांवर पोलीसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ उद्या सोमवारी दि.०४ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने इंदापूर शहर व तालुका बंद ची हाक देण्यात आली आहे.तसेच सोमवार दिनांक ०४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती इंदापूर समोर समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात येणार आहे.या संदर्भातील लेखी निवेदन इंदापूर तहसील कार्यालय आणि इंदापूर पोलीस विभागास देण्यात आले आहे.
पोलीसांच्या माध्यमातून अचानक हल्ला करून लोकशाही शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षण देण्याऐवजी उपोषण कर्त्यांवर हल्ला केला. यामध्ये अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटनेचा निषेध म्हणून इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने व मराठा क्रांती मोर्चा इंदापूरच्या वतीने संपूर्ण इंदापूर तालुका सोमवार दिनांक ०४ सप्टेंबर रोजी बंदचे आवाहन केले आहे.
झालेली घटना निषेधार्य असून या सर्व बाबी हल्ला करणाऱ्या व हल्याचा आदेश देणाऱ्या संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. व महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण त्वरीत लागू करावे या मागणी साठी इंदापूर तालुका व इंदापूर शहर बंद व रस्ता रोको या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे.
What's Your Reaction?