भाजपाच्या वतीने भिगवण येथे 3 ऑक्टोंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर

Oct 2, 2023 - 15:53
 0  466
भाजपाच्या वतीने भिगवण येथे 3 ऑक्टोंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर

आय मिरर

ज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, पुणे जिल्हा च्या वतीने " सेवा पंधरवडा" निमित्ताने भिगवण ता. इंदापूर येथील भिगवण महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे उद्या दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वा. आयोजन करण्यात आले आहे. 

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

सामाजिक बांधिलकीतून मोठ्या संख्येने युवा वर्ग व नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow