24 डिसेंबरला अवघे काही दिवस शिल्लक असताना आता हालचालींना वेग ! जरांगे पाटलांनी बोलावली 123 गावातील मराठा बांधवांची बैठक

Dec 21, 2023 - 14:34
 0  584
24 डिसेंबरला अवघे काही दिवस शिल्लक असताना आता हालचालींना वेग ! जरांगे पाटलांनी बोलावली 123 गावातील मराठा बांधवांची बैठक

आय मिरर

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे.

24 डिसेंबरला अवघे काही दिवस शिल्लक असताना आता हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधावांची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी 123 गावातील मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला गोदा काठच्या 123 गावांतील मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. 24 तारखेनंतरच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे आज दुपारी सरकारचं शिष्टमंडळ देखील अंतरवाली सराटीमध्ये येण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन हे आज अंतरवालीत येण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरुवातीला सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र त्याचबरोबत सरकारला मराठा आरक्षणासाठी त्यांनी 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow