BIG BREAKING || बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सहलीच्या बसला अघपात,एकाचा मृत्यू तर काही जखमी 

Dec 21, 2023 - 11:22
Dec 21, 2023 - 11:32
 0  3592
BIG BREAKING || बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सहलीच्या बसला अघपात,एकाचा मृत्यू तर काही जखमी 

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल निमित्त विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसला गुरुवारी पहाटेच्या सुमारास माळशिरस अकलुज रोडवर माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती येथे अपघात झाला आहे.या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाल्याची तर एक शिक्षक व काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अकलुज आगाराची एम एच १४ बी.टी.४७०१ ही बस इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल घेऊन गेली होती. याच प्रवासा दरम्यान आज पहाटे बस आणि टेम्पो मध्ये अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर एक शिक्षकासह काही विद्यार्थी जखमी असून जखमीला 108 सेवेच्या रुग्णवाहिकेतून अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow