कांदलगावातील दादासाहेब पाटील विद्यालयात पार पडलं विज्ञान प्रदर्शन,83 प्रकल्पाचे सादरीकरण

Dec 21, 2023 - 14:58
Dec 21, 2023 - 15:00
 0  276
कांदलगावातील दादासाहेब पाटील विद्यालयात पार पडलं विज्ञान प्रदर्शन,83 प्रकल्पाचे सादरीकरण

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मधील दादासाहेब पाटील विद्यालयामध्ये दोन दिवसीय शालेय विज्ञान प्रदर्शन पार पडले.या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट रणजीत बाबर पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते सातवीच्या लहान गटातून 42 प्रकल्प तर इयत्ता आठवी ते दहावीच्या मोठ्या गटातून 41 प्रकल्प असे एकूण 83 प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.विद्यालयातून विद्यार्थ्यांनी फार उपयुक्त असे टाकाऊ पासून टिकाऊ, हवेची गुणवत्ता सुधारणे, लेझर लाईट सिक्युरिटी,सूक्ष्म सिंचन, चांद्रयान मोहीम,सौर ऊर्जा असे विविध विषयावर प्रकल्प सादर केले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव ननवरे,सचिव पांडुरंग काशीद, मुख्याध्यापक राम जमदाडे यांसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थ व परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. प्रदर्शनाचे नियोजन विज्ञान शिक्षक श्री. तनपुरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow