आरक्षणाची लढाई 85 टक्के जिंकलोय आता.., ठाण्याच्या सभेत नेमकं काय म्हणाले जरांगे?

Nov 22, 2023 - 08:02
 0  344
आरक्षणाची लढाई 85 टक्के जिंकलोय आता.., ठाण्याच्या सभेत नेमकं काय म्हणाले जरांगे?

आय मिरर

मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी 24 डिसेंबपर्यंतची डेडलाईन दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे.मंगळवारी दि.21 नोव्हेंबर ला त्यांची ठाण्यात सभा झाली. मराठा आरक्षण लढाई 85 टक्के जिंकलो आहोत, आता फक्त कायदा होण्याची वाट पाहायची असं यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

मराठा आरक्षणाची लढाई आपण 85 टक्के जिंकलो आहोत. आता फक्त कायदा होण्याची वाट पाहायची. 24 डिसेंबरपर्यंत आपल्या सर्वांची कसोटी आहे. ज्यावेळी उपोषण सोडलं त्यावेळी मुख्यमंत्र्यांचं शिष्यमंडळ आलं होतं. ते म्हणाले बंद खोलीत बोलू पण मला पटांगणात लढायची सवय आहे. बंद खोली मला जमत नाही. मराठे कधीही मैदानात लढतात. क्षत्रीय मराठा लढतो आणि शेतकरी मराठा शेती करतो असे दोन मराठ्यांचे अंग आहेत. आता आमच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे आम्हाला आरक्षण द्यावच लागेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्या उपोषणानंतर राज्य सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं. त्यानंतर त्यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आता सरकारला आरक्षणासाठी 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow