सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! अखेर जरांगे पाटलांच्या लढ्याला यश
आय मिरर
मराठा बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दीर्घकाळापासून सुरु असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला यश आलेय. रात्री अकराच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ अधिकारी जरांगेच्या शिष्टाईसाठी आलं होतं. तब्बल अडीच ते तीन तास चर्चा करत सरकारने दिलेला अध्यादेश जरांगे पाटील आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना येऊन सांगत होते. त्यांचा होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच आझाद मैदानात जाणार नसल्याच त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व लोक मावतील असं मोठं मैदान बघून एक तारीख जाहीर करून आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
यानंतर संपूर्ण राज्यात या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत होत आहे. जवळपास साठ वर्षाहून अधिक काळ सुरु असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा आता सत्त्यात उतरला असल्याने मराठा समाज बांधव फटाके फोडून याचे स्वागत करीत आहेत.एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत.
मनोज जरांगे पाटील आज सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते सभा घेणार आहेत. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दीपक केसरकर गृहनिर्माण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश मनोज जरांगे पाटील स्वीकारून हे उपोषण सोडणार आहेत. दीर्घकाळापासून सुरु असलेला मराठ्यांचा हा लढा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
‘मुंबईला जाणार नाही’, मनोज जरांगेंची मोठी घोषणा……
भगवं वादळ हे लवकरच मुंबईत धडकणार होतं. मात्र आता हे वादळ सरकारने शांत केल्याचं दिसतंय. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, राज्य सरकारने सर्व कागदपत्रे त्यांना दिले आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती देखील त्यांना करण्यात आली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊन त्यांचं उपोषण सोडावं. तर आज सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन त्यांचं उपोषण सोडतील.
इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मध्ये तरुणांचा जल्लोष……
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी महाराष्ट्रात गावोगावी साखळी उपोषणे करण्यात आली. यामध्ये इंदापूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात साखळी उपोषणे झाली. इंदापूरच्या कांदलगाव मध्ये जवळपास 100 दिवस अधिक साखळी उपोषण सुरू होते.सरकारने मनोज जारंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करताच गावातील तरुणांनी साखळी उपोषण स्थळी मुख्य चौकात फटाक्यांची अतिशबाजी केली आणि आनंद उत्सव साजरा केला.
या मागण्या केल्या मान्य…
-ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र दिलं जावं. तसंच त्यांच्या कुटुंबांना देखील द्यावं.
-सरकारने सगा सोयराविषयी अध्यादेश काढला. तो जरांगे पाटलांना दिला.
-राज्यातील मराठी बांधवांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.
-वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमणार
-मराठवाड्यात कमी प्रमाणात पत्र सापडले. याविषयी आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करेल.
-विधानसभेमध्ये याविषयी कायदा येणार.
यानंतर काय म्हणाले मनोज जरांगे पाटील…
एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे.समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे.सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्र घेऊन येणार आहेत.मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं आहेउद्या आम्ही येथे सभा घेणार आहोत. मुंबईत जाणार नाही विजयी सभा जागा पाहून तारीख ठरवून करणार.
What's Your Reaction?