आळंदी येथे सोहळ्यामध्ये शहा दांपत्याचा सन्मान
आय मिरर(देवा राखुंडे)
बाबासाहेब आजरेकर फडाचे विठ्ठल वामन भुरे तथा विठोबा अण्णा आजरेकर माउली यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त आळंदी (ता. खेड) येथे झालेल्या सोहळ्यामध्ये इंदापूर येथील कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व वैशाली शहा या उभयतांचा सन्मान करण्यात आला.
विठोबा आजरेकर हे आजरेकर फडाचे पाचवे फड प्रमुख होते, तर भरत शहा यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक नारायणदास रामदास शहा सुमारे ३० वर्षांपासून फडाचे खजिनदार होते. विठोबा अण्णा आजरेकर, केशवराव जाधव, तुकाराम एकनाथ काळे, हरिदास रामभाऊ बोराटे, माऊली आजरेकर यांचा इंदापूरशी बऱ्याच वर्षांपासूनचा ऋणानुबंध होता. या ऋणानुबंधांचे प्रतीक म्हणून भरत शहा यांचा सपत्निक सन्मान केल्याची माहिती संजय बोराटे यांनी दिली.
What's Your Reaction?