जरांगे पाटलांच्या लढ्याला यश ! इंदापूरात आ.भरणेंनी मराठा बांधवांसोबत साजरा केला आनंदोत्सव
आय मिरर(देवा राखुंडे)
दीर्घकाळापासून सुरु असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत अद्यादेश काढला आहे.यानंतर सर्वत्र फटाके फोडून पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात ही माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी मराठा समाज बांधवांना पेढे भरवत या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आमदार भरणे यांनी शहरातील वाघ पॅलेस येथे भेट देत उपस्थित मराठा समाज बांधवांशी संवाद साधत राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह तमाम मराठा बांधवांनी उपोषण केले,आंदोलन केले.याला आज यश आले.मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून हे शक्य झाले असल्याचं म्हटले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह अनेक मराठा बांधवांनी एकमेकांना पेढे भरवून राज्य सरकारचे आभार मानले व फटाके वाजवून आनंद साजरा केला.
इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मध्ये तरुणांचा जल्लोष……
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी महाराष्ट्रात गावोगावी साखळी उपोषणे करण्यात आली. यामध्ये इंदापूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात साखळी उपोषणे झाली. इंदापूरच्या कांदलगाव मध्ये जवळपास 100 दिवस अधिक साखळी उपोषण सुरू होते.सरकारने मनोज जारंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करताच गावातील तरुणांनी साखळी उपोषण स्थळी मुख्य चौकात फटाक्यांची अतिशबाजी केली आणि आनंद उत्सव साजरा केला.
या मागण्या केल्या मान्य…
-ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र दिलं जावं. तसंच त्यांच्या कुटुंबांना देखील द्यावं.
-सरकारने सगा सोयराविषयी अध्यादेश काढला. तो जरांगे पाटलांना दिला.
-राज्यातील मराठी बांधवांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.
-वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमणार
-मराठवाड्यात कमी प्रमाणात पत्र सापडले. याविषयी आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करेल.
-विधानसभेमध्ये याविषयी कायदा येणार.
What's Your Reaction?