शाब्बास भिगवण पोलीस ! पुणे ग्रामीण पोलीस दलात प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार मिळवत फडकवला झेंडा

Oct 12, 2023 - 08:00
Oct 12, 2023 - 08:21
 0  988
शाब्बास भिगवण पोलीस ! पुणे ग्रामीण पोलीस दलात प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार मिळवत फडकवला झेंडा

"याच सर्व श्रेय्य मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांना देतो. त्यांच्यामुळेच भिगवण पोलिसांची मान आज जिल्ह्यात उंचावली गेली. भविष्यातही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भिगवण पोलीस ठाण्यातील माझ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने अधिक उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल." - सहा.पो.नि.दिलीप पवार

आय मिरर (देवा राखुंडे/विजयकुमार गायकवाड) 

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आपल्या कार्यकुशलतेमुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलात पुन्हा एकदा चेर्चेत आले आहेत.

पवार हे उत्तम प्रशासक,पोलीस ठाण्यावर मजबूत पकड असणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.पोलीस खात्यात काम करीत असताना प्रसंगी कठोर पावले उचलत केलेल्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात "भिगवण पोलीस" ठाण्याने सप्टेंबर 2023 महिन्यातील कामगिरीमध्ये तुलनात्मकरित्या सर्वोत्तम कामगिरी केल्याने जिल्ह्यातील प्रथम क्रमांक मिळवला आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी भिगवण पोलिसांच्या या कार्याची दखल घेत बुधवारी दि.11 रोजी दिलीप पवार यांना सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.

यापूर्वी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याचा पदभार दिलीप पवार यांनी सांभाळलेला आहे. यापूर्वी ही त्यांची कारकिर्द चांगली राहिली असून ते टीम वर्क करतात.पोलीस अधीक्षकांसह,अपर पोलीस अधिक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे सतत चे योग्य व सकारात्मक मार्गदर्शन त्यांना लाभत असते.शेतकऱ्याचे किरकोळ वाद ते स्वतः लक्ष घालून वेळ देऊन मिटवण्यावर त्यांचा भर असतो.विशेष म्हणजे भिगवण कार्यक्षेत्रात रात्रगस्त बाबत ते नेहमी सतर्क असतात.

भिगवण पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना दोन वेळा पवार यांना 2021-2022 मध्ये शासनाकडून पोलीस खात्यांतर्गत बहर्जी नाईक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.त्यांना बेस्ट डिटेक्शन,बेस्ट रिकव्हरी, ग्रीन वर्ल्ड अशा पुरस्कारांसह साद फाउंडेशन कडून इंदापूर भूषण पुरस्कार मिळाले आहेत.

तर आता 2023 मध्ये भिगवण पोलीस ठाण्यास सप्टेंबर 2023 महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करत जिल्ह्यातील प्रथम क्रमांक मिळवून देत त्यांनी आपल्या कार्याचा झेंडा फडकवल्याने अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिलीप पवार यांच्यासह भिगवण पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow