मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर लाखेवाडी ग्रामपंचायतचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र ! वाचा काय लिहिलय पत्रात
आय मिरर
गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची धगधगती आग संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाची आंदोलने निदर्शने ही करण्यात आली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजामध्ये सरकार विरोधात तीव्र संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं.
गुरुवारी रात्री राज्य सरकारच्या शिष्टमंडळात सोबत जरांगे पाटील यांची यशस्वी चर्चा झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी दोन जानेवारीपर्यंत आपलं अमरण उपोषण स्थगित केलं मात्र 2 जानेवारी च्या पुढे एकही दिवस ओलांडणार नसून मुंबईच नाक दाबेन असा गर्भित इशाराच जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
जरांगे पाटील यांनी दोन जानेवारीपर्यंत आमरण उपोषण स्थगित केलं असलं तरीदेखील राज्यात साखळी उपोषणा सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. आरक्षणाच्या मुद्दयावरुन इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच चित्रलेखा ढोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवलं आहे.
पत्रात म्हटले आहे की, राज्यातील मराठा समाज हा एक मुख्य घटक आहे.या समाजाचे महाराष्ट्राच्या विकासात अमूल्य व महत्त्वपूर्ण योगदान आहे. या समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून बहुतांश समाज हा अल्पभूधारक आहे. मराठा समाजाची आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती बिकट आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळावे मराठा समाजातील सर्वांना कुणबी दाखले देण्यात यावेत. लाखेवाडी ग्रामपंचायतची सरपंच या नात्याने मी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यास जाहीर पाठिंबा देत आहे. याच सोबत राज्य सरकारने त्वरित मराठा समाजास आरक्षण जाहीर करावं अशी मागणी ही चित्रलेखा ढोले यांनी या पत्राद्वारे केली आहे.
कांदलगांव लाखेवाडीत कॅण्डल मार्च - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी मराठा समाज बांधवांकडून निदर्शने केली जात आहेत. संविधानिक पद्धतीने कॅण्डल मार्च काढले जात आहेत. लाखेवाडीत देखील शेकडो महिला पुरुषांच्या उपस्थितीत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या.दरम्यान गुरुवारी रात्री मनोज जहांगे पाटील यांनी सरकारच्या विनंतीला मान देऊन आपलं आमरण उपोषण मागे घेतले.त्यानंतर इंदापूरच्या कांदलगाव,इंदापूर शहर सह विविध ठिकाणी सुरू असणारी आमरण उपोषणे मागे घेण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कांदलगाव मध्ये कॅण्डल मार्च काढला जाणार असून साखळी उपोषणाची पुढील दिशाही ठरवली जाणार आहे.
What's Your Reaction?